• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

जळगाव परिमंडलात सव्वातीन लाख वीजग्राहकांना अडीच कोटींची सवलत!

जळगाव (प्रतिनिधी):- आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे वीज क्षेत्रात क्रांती घडतेय. ग्राहकांना विजेचा अचूक वापर कळतोय; शिवाय वापरावरही नियंत्रण ठेवता येतेय. विशेष म्हणजे घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापरावर महावितरण घसघशीत सवलतही देत आहे. जळगाव परिमंडलातील 3 लाख 25 हजार 336 घरगुती ग्राहकांना आतापर्यंत अडीच कोटी रुपयांहून अधिक रकमेची सवलत मिळाली आहे.  ही सवलत मिळवण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर आवश्यक आहे. ते बसवण्यासाठी ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

ग्राहकांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा गतवर्षीच्या जुलै महिन्यापासून  सुरू झाला‍.

जळगाव परिमंडलात 3 लाख 25 हजार 336 घरगुती ग्राहकांना जुलै-2025 ते मार्च-2026 या नऊ महिन्यांच्या वीजबिलात 2 कोटी 56 लाख 94 हजार रुपयांची टीओडी सवलत मिळाली. जळगाव मंडलातील 2 लाख 6 हजार 683 ग्राहकांना 1 कोटी 46 लाख 1 हजार रुपये, धुळे मंडलातील 73 हजार 805 ग्राहकांना 61 लाख 34 हजार रुपये तर नंदुरबार मंडलातील 44 हजार 848 ग्राहकांना 49 लाख 64 हजार रुपये सवलत मिळाली.

नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरमुळे योग्य रीडिंग होत  असल्याने अचूक बिले मिळून घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याद्वारे ग्राहकांचे वीजवापरावरही थेट नियंत्रण राहणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, ओव्हन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे. विशेष म्हणजे महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.

टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडीप्रमाणे आकारणी सुरू करण्यात आली आहे. महावितरणकडून सन 2025 ते 2030 या पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांसाठी टाईम ऑफ डे (टीओडी) नुसार स्वस्त वीजदराचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत मंजूर केली आहे. यात 1 जुलै 2025 ते मार्च 2026 मध्ये 80 पैसे प्रतियुनिट सवलत मिळाली. पुढील तीन आर्थिक वर्षात ही सवलत वाढत जाणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसवणे आवश्यक आहे.

ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीजमीटर  प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळणार आहेत. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. यात मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. टीओडी मीटर असल्याशिवाय घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापराची सवलत मिळू शकणार नाही. त्यामुळे वीज ग्राहकांनी टीओडी मीटर बसविण्याकामी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.


 

 

Tags: #jalgaon mahavitran #maharashtra #bharat
Previous Post

नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखांत फसवणाऱ्या संशयिताच्या पत्नीवर गुन्हा दाखल

Next Post

राहुल सांगळे यांची ‘शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना’ जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राहुल सांगळे यांची ‘शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना’ जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

राहुल सांगळे यांची 'शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना' जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक
1xbet russia

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

यावल बसस्थानकात प्रवाशाची पर्स लांबविली

May 25, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

May 25, 2026
इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

यावल बसस्थानकात प्रवाशाची पर्स लांबविली

May 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon