मातीची सुपीकता आणि पाणी साठवण क्षमता: शाश्वत शेतीचा खरा पाया
आजच्या आधुनिक शेतीमध्ये पिकांचे अवशेष (थरीींरसश) शेतातच जाळून टाकण्याची किंवा फेकून देण्याची चुकीची पद्धत रूढ होत आहे. यामुळे जमिनीचे आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. याउलट, गहू आणि कापसाचे वेस्टेज जमिनीत गाडल्यास जमिनीची जलधारण क्षमता (थरींशी केश्रवळपस उररिलळीूं) आणि सुपीकता कमालीची वाढते.
१. जमिनीची जलधारण क्षमता (थरींशी केश्रवळपस उररिलळीूं) वाढणे गव्हाचा कोंडा (कराडी) आणि कापसाची धसकटे जमिनीत गाडल्यानंतर त्यांचे हळूहळू विघटन होते. यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते: जमिनीत स्पंजसारखी रचना तयार होते, जी पाणी धरून ठेवण्यास मदत करते.
बाष्पीभवन कमी होते: जमिनीतील ओलावा प्रदीर्घ काळ टिकून राहतो, ज्यामुळे पिकांना पाण्याच्या ताणास सामोरे जावे लागत नाही.
भूजल पातळी वाढते: पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत जास्तीत जास्त मुरते.२. जमिनीची सुपीकता आणि पोत सुधारणेकापूस आणि गव्हाच्या अवशेषांमध्ये नत्र, स्फुरद, पालाश आणि अनेक सूक्ष्म अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात असतात.
जिवाणूंची संख्या वाढते: हे अवशेष जमिनीत गाडल्यामुळे फायदेशीर जिवाणू (इरलींशीळर) आणि गांडुळांची संख्या वेगाने वाढते.
जमीन भुसभुशीत होते: घट्ट झालेली जमीन मऊ आणि भुसभुशीत होते, ज्यामुळे पिकांच्या मुळांची वाढ उत्तम होते.
खतांचा खर्च वाचतो: सेंद्रिय खत शेतातच तयार झाल्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो.
अवशेष जमिनीत गाडण्याची योग्य पद्धत
कापसाची धसकटे: कापणीनंतर रोटाव्हेटर किंवा कटरच्या साहाय्याने कापसाच्या पराट्यांचे बारीक तुकडे करून घ्यावेत आणि ते जमिनीत
नांगरणी करून गाडावेत.गव्हाचे अवशेष: गव्हाची काढणी झाल्यावर शिल्लक राहिलेले अवशेष जमिनीत मिसळून हलके पाणी द्यावे, जेणेकरून ते लवकर कुजतील.
कुजण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी: प्रति एकर १० किलो युरिया किंवा वेस्ट डीकंपोजरचा वापर करावा.निष्कर्ष:”कचरा नव्हे, हे तर सोन्यासारखे खत आहे!” गहू आणि कापसाचे अवशेष जमिनीत गाडून शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनीचे आरोग्य सुधारावे, पाणी साठवण्याची क्षमता वाढवावी आणि शाश्वत व फायदेशीर शेतीकडे पाऊल टाकावे.

प्रा. सुशील रंगनाथ चव्हाण
(कृषी विस्तार विभाग)
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय,
जळगाव.









