• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गहू व कापसाचे अवशेष ठरतील शेतकर्‍यांसाठी नैसर्गिक खत; प्रा. सुशील चव्हाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 24, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गहू व कापसाचे अवशेष ठरतील शेतकर्‍यांसाठी नैसर्गिक खत; प्रा. सुशील चव्हाण

पिकांचे अवशेष जाळू नका, जमिनीत गाडा; जमिनीची सुपीकता आणि जलधारण क्षमता वाढवा!

जळगाव : आधुनिक शेतीमध्ये पिकांची काढणी झाल्यानंतर शेतात उरलेले अवशेष जाळण्याची किंवा फेकून देण्याची पद्धत अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र, हेच अवशेष जमिनीत मिसळल्यास जमिनीचे आरोग्य सुधारण्यासह सुपीकता आणि पाणी साठवण क्षमता वाढविण्यास मोठी मदत होऊ शकते.

त्यामुळे गहू आणि कापसाचे अवशेष जाळण्याऐवजी त्यांचे योग्य व्यवस्थापन करून जमिनीत गाडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषी विस्तार विभागाचे प्रा. सुशील रंगनाथ चव्हाण यांनी केले.
गव्हाचा कोंडा, काड आणि कापसाची धसकटे यांसारख्या पिकांच्या अवशेषांचे जमिनीत हळूहळू विघटन झाल्याने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची रचना सुधारते आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. परिणामी जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो.

पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासही मदत होते. यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन पिकांना ओलाव्याचा लाभ मिळतो.पिकांचे अवशेष जमिनीत गाडल्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव आणि गांडुळांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होते. जमिनीचा पोत सुधारून ती भुसभुशीत बनते. त्यामुळे पिकांच्या मुळांची वाढ चांगली होते. तसेच अवशेषांच्या विघटनातून विविध अन्नद्रव्ये जमिनीत परत मिसळल्याने जमिनीची नैसर्गिक सुपीकता टिकविण्यास मदत होते. दीर्घकालीन दृष्टीने रासायनिक खतांवरील अवलंबित्व आणि शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासही या पद्धतीचा फायदा होऊ शकतो.अवशेष जमिनीत गाडण्याची योग्य पद्धतकापसाची काढणी झाल्यानंतर धसकटांचे रोटाव्हेटर किंवा कटरच्या साहाय्याने बारीक तुकडे करून नांगरणीद्वारे जमिनीत मिसळावेत. गव्हाची काढणी झाल्यानंतर उरलेले काड व इतर अवशेष जमिनीत मिसळून आवश्यकतेनुसार हलके पाणी द्यावे.

अवशेषांचे विघटन जलद होण्यासाठी प्रति एकर १० किलो युरिया किंवा योग्य पद्धतीने वेस्ट डीकंपोजरचा वापर करता येतो. मात्र, जमिनीचा प्रकार, पीकपद्धती आणि अवशेषांचे प्रमाण लक्षात घेऊन कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याचा वापर करावा.कचरा नव्हे, हे तर जमिनीचे नैसर्गिक धन!शेतातील पिकांचे अवशेष ही समस्या नसून जमिनीची सुपीकता वाढविण्याची एक महत्त्वाची नैसर्गिक संधी आहे. शेतकर्‍यांनी अवशेष जाळण्याची पद्धत टाळून त्यांचे जमिनीत पुनर्चक्रण करावे. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासोबतच जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेतीला चालना मिळेल, असे आवाहन प्रा. सुशील रंगनाथ चव्हाण यांनी केले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव.प्रा. सुशील रंगनाथ चव्हाण(कृषी विस्तार विभाग

Next Post

पारोळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पारोळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पारोळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
क्राईम

पारोळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

October 24, 2026
गहू व कापसाचे अवशेष ठरतील शेतकर्‍यांसाठी नैसर्गिक खत; प्रा. सुशील चव्हाण
खान्देश

गहू व कापसाचे अवशेष ठरतील शेतकर्‍यांसाठी नैसर्गिक खत; प्रा. सुशील चव्हाण

October 24, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव.प्रा. सुशील रंगनाथ चव्हाण(कृषी विस्तार विभाग
खान्देश

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव.प्रा. सुशील रंगनाथ चव्हाण(कृषी विस्तार विभाग

October 24, 2026
पाळधीजवळ बायपासच्या पुलाचा भराव खचला; क्रेन थेट उड्डाणपुलावरून कोसळून एकाचा मृत्यू!
क्राईम

पाळधीजवळ बायपासच्या पुलाचा भराव खचला; क्रेन थेट उड्डाणपुलावरून कोसळून एकाचा मृत्यू!

October 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पारोळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

October 24, 2026
गहू व कापसाचे अवशेष ठरतील शेतकर्‍यांसाठी नैसर्गिक खत; प्रा. सुशील चव्हाण

गहू व कापसाचे अवशेष ठरतील शेतकर्‍यांसाठी नैसर्गिक खत; प्रा. सुशील चव्हाण

October 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!