जळगावात सुरु होते उपचार
जळगाव (प्रतिनिधी) : येथील रहिवासी व ठाणे जिल्ह्यात कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबलवर पोटाच्या आजारामुळे गेल्या काही दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांचा उपचारादरम्यान मंगळवारी दि. २ जुलै रोजी मृत्यू झाला आहे.
पोहेकॉ हेमंत रघुनाथ अहिरे (४२, रा. गणेश कॉलनी, जळगाव) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.हेमंत अहिरे हे ठाणे जिल्ह्यातील कोळशेवाडी पोलिस ठाण्यात कामाला होते. पोटाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर जळगावात खासगी रुग्णालयात काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील कार्यवाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश अहिरे यांचे ते चुलत भाऊ होते.