भाईंदर रेल्वे सटेशनजववळील ह्रदयद्रावक घटना
भाईंदर ( वृत्तसंस्था ) ;- भाईंदर रेल्वे स्थानकातून वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याचे हृदय पिळवटून टाकणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेत वडील आणि मुलगा प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी बोलत विरारच्या दिशेने जात असतांना विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनसमोर आडवे झाले.
मुलाचे नाव जय मेहता असं असून तो २२ वर्षांचा होता. या प्रकरणी वसई पोलिसात नोंद झाली असून तपास सुरू आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार भाईंदर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडिओत दिसते की, वडील आणि मुलगा प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी बोलत विरारच्या दिशेने जाताना दिसत आहेत. त्यानंतर प्लॅटफॉर्मवरून खाली उतरून ते काही अंतर चालून जातात व दोघे पिता-पुत्र विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनसमोर आडवे होतात.याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एडीआरशिवाय गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे