नंदुरबार आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
बोदवड (प्रतिनिधी ) बोदवड तालुका कृषी अधिकारी छगन जहागीर पाडवी यांना सोमवारी सायंकाळी शहरातील उजनी रस्त्यावर एका शेताजवळून नंदुरबार आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्यावर मुंबई, पुणे, नंदुरबारसह बोदवड येथे ईडीचे गुन्हे दाखल आहेत.
मुंबईसह नवी मुंबई, पुणे, नंदुरबार, बोदवड, आणि इडी (प्रवर्तन संचालनालाय) अंतर्गत टेरर फंडिंगचा गुन्हा नोंद छगन पाडवी यांच्याविरोधात दाखल आहे. पाडवी यांचा अटकपूर्व जामीन नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने 25 मे रोजी फेटाळला आहे.
छगन पाडवी हे एका उजनी रस्त्यावरील एका शेतात पाहणीसाठी चालकासोबत गेल्यानंतर त्यांच्या वाहनाच्या पुढे एक वाहन लावून कृषी अधिकार्यांना वाहनातून उतरवून दुसर्या वाहनात बसवण्यात आले. बोदवड पोलिसांना त्यांच्या चालकाने अपहरण झाल्याचे सांगितले . मात्र तपासात त्यांचे भाचे व कुर्ला पोलीस कर्मचारी व या प्रकरणातील फिर्यादी नारसिंग पाडवी समोर आल्यानंतर प्रकरण समोर आले. . नंदुरबार आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केल्याची माहिती बोदवड पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी दिली.