पीडब्ल्यूडीचा आरेखक एसीबीच्या जाळ्यात
तक्रारदाराची धाव एसीबीकडे
तक्रारदाराकडून प्रथम २ हजार ‘खुशाली’ आणि काम पूर्ण झाल्यावर १५ हजार रुपये अशी मागणी आरेखक वासुदेव पाथरवट (वय ५३, रा. भुसावळ) याने केली होती. मागणी नाकारल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली.
कार्यालयातच सापळा
२४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने पाथरवटला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल
लाच रक्कम व पुरावे जप्त करण्यात आले असून पाथरवटविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसीबीमार्फत सुरू आहे.









