पारोळा ;- राज्यासह जिल्ह्यात रविवारीरात्री आलेल्या जोरदार पावसामुळे पारोळा तालुक्यातील शिरसोदे शिवारात वीज पडून १५ मेंढ्यांसह शेळी ठार झाल्याची घटना घडली असून यामुळे मेंढपाळांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शिरसोदे येथे मखनापूर पाझर तलाव परिसरात दामू भिल यांचा शेळी मेंढी पालनाचा व्यवसाय असून राविवारी झालेल्या पावसाने वीज पडून त्यांच्या १५ मेंढ्या आणि एक शेळी ठार झाल्याची घटना घडली . वीज पडून त्यांच्या १५ मेंढ्या आणि १ बकरी ठार झाल्याने मेंढपाळाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती कळताच पोलीस पाटील बंडू पाटील कोतवाल, भरत पवार तलाठी प्रवीण शिंदे यांनी पंचनामा केला. दरम्यान या घटनेची मंत्री अनिल भाईदास पाटील यांना दाखल घेतली असून दूरध्वनीवर माहिती देऊन नुकसानग्रस्त मेंढपाळासाठी नुकसानीची मागणी केले आहे.