• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

जळगाव : छातीत तीव्र वेदना सुरू झाल्याने गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या ६५ वर्षीय रुग्णाचे प्राण डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांनी वेळेत केलेल्या पामी शस्त्रक्रियेमुळे वाचविण्यात यश मिळविले आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणारी प्रमुख रक्तवाहिनी १०० टक्के बंद झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर तातडीने करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला नवजीवन मिळाले. यावल तालुक्यातील सुभाष नामक ६५ वर्षीय रुग्णाला अचानक छातीत तीव्र दुखणे, घाम येणे आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील आपत्कालीन विभागाने त्वरित उपचार सुरू करत हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली आणि डॉ. झिशान यांना पाचारण केले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने तत्काळ ईसीजी, रक्त तपासण्या आणि इतर आवश्यक चाचण्या करण्यात आल्या.तपासणी अहवालातून रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले. त्यानंतर करण्यात आलेल्या अँजिओग्राफीमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणारी एक महत्त्वाची कोरोनरी रक्तवाहिनी १०० टक्के ब्लॉक झाल्याचे आढळून आले. या स्थितीत उपचारास विलंब झाल्यास हृदयाच्या स्नायूंना कायमस्वरूपी नुकसान होण्याचा तसेच रुग्णाचा जीव धोक्यात येण्याचा संभव असल्याने डॉक्टरांनी तातडीने पामी करण्याचा निर्णय घेतला. हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली आणि डॉ. झिशान यांनी अनुभवी वैद्यकीय पथकाच्या सहाय्याने अत्याधुनिक कॅथलॅबमध्ये यशस्वीरीत्या पामी शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रियेदरम्यान बंद झालेल्या रक्तवाहिनीतील अडथळा दूर करण्यात आला आणि आवश्यकतेनुसार स्टेंट बसवून रक्तप्रवाह पूर्ववत करण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून छातीतील वेदना पूर्णपणे कमी झाल्या आहेत. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना पुढील वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार देण्यात येत आहेत.

हृदयविकाराच्या झटक्याच्या रुग्णांमध्ये प्रत्येक मिनिट अत्यंत महत्त्वाचा असतो. रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाल्यानंतर जितक्या लवकर उपचार केले जातात तितके हृदयाचे नुकसान कमी होते. संबंधित रुग्णाला वेळेत रुग्णालयात आणण्यात आले आणि तातडीने पामी शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घाम येणे किंवा डाव्या हातात वेदना जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी वेळ न दवडता त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

– डॉ. अदनान अली,

डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

Next Post

जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाज बांधवांचा वृक्षारोपण उपक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाज बांधवांचा वृक्षारोपण उपक्रम

जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाज बांधवांचा वृक्षारोपण उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर
खान्देश

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू
खान्देश

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जैन कंपनी

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon