• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यात भररस्त्यात शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

२ लाख ४० हजारांचा ऐवज लंपास ; भडगाव-पाचोरा रस्त्यावरील घटना

पाचोरा (प्रतिनिधी):- शहरातील भडगाव-पाचोरा रस्त्यावरील जय भवानी मॉलजवळ शुक्रवारी (१५ मे) रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने पायी चालत जाणाऱ्या शिक्षिकेच्या गळ्यातील २ लाख ४० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची मिनी पोत जबरदस्तीने हिसकावून पळवून नेली. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी कॉलनी येथील रहिवासी आणि व्यवसायाने शिक्षिका असलेल्या वैशाली योगेश मोरे (वय ४६) या त्यांची बहीण रेखा भीमराव चव्हाण यांच्यासह घरगुती सामान खरेदी करण्यासाठी भडगाव रोडवरील जय भवानी मॉल येथे गेल्या होत्या. रात्री पाऊण वाजेच्या सुमारास खरेदी करून त्या दोन्ही भगिनी पायी घराकडे परतत होत्या.

ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी परिसरातील रस्त्यावरील वीज पुरवठा किंवा पथदिवे बंद असल्याने सर्वत्र अंधार होता. याचाच फायदा घेत एका साधारण ४० वर्षे वयाच्या, मजबूत शरीरयष्टीच्या अज्ञात इसमाने महिलांच्या नकळत मागून येऊन गराडा घातला. काही समजण्याच्या आतच त्याने वैशाली मोरे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत जोरात हिसकावून पळ काढला.

पोत गळ्यातून ओढल्याचे लक्षात येताच दोन्ही महिलांनी “चोर-चोर” असा आरडाओरडा केला आणि चोरट्याच्या पाठीमागे धाव घेतली. मात्र, अंधार असल्यामुळे आजूबाजूचे नागरिक जमा होण्यापूर्वीच, चोरट्याने काही अंतरावर उभी करून ठेवलेली आपली मोटरसायकल स्टार्ट केली आणि तो वेगाने अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री. बापू रोहम आणि भडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराची पाहणी केली.

या संदर्भात वैशाली मोरे यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायळ करत आहेत. शहरात भररस्त्यात महिला सुरक्षित नसल्याने नागरिकांमधून आणि विशेषतः महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असून, बंद पथदिव्यांबाबतही रोष निर्माण झाला आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

जिल्ह्यातील १०५ अंगणवाड्यांना मिळणार हक्काचे छत

Next Post

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम
1xbet russia

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

August 20, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

August 20, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण धडकेत तरुण ठार; दोन गंभीर जखमी

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

August 20, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon