• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यातील १०५ अंगणवाड्यांना मिळणार हक्काचे छत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

डीपीडीसीकडून १५.५० कोटींचा निधी; ७१ अंगणवाड्या अजूनही भाड्याच्या इमारतीत

जळगाव (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील चिमुकल्यांसाठी आनंदाची बातमी असून, नव्याने १०५ अंगणवाड्यांच्या इमारती उभारण्यास गती मिळाली आहे. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) निधीतून या अंगणवाड्यांची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी तब्बल १५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यातील ७६ अंगणवाड्यांच्या बांधकामांचे कार्यादेश देण्यात आले असून कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी या कामांचा आढावा घेत ४८ अंगणवाड्यांची कामे मार्चअखेर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तर उर्वरित ५७ अंगणवाड्यांची कामे जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात सध्या ३ हजार ६०० हून अधिक अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी सुमारे ३ हजार ४०० अंगणवाड्यांना स्वतःची इमारत उपलब्ध आहे. मात्र अजूनही ७१ अंगणवाड्या शाळा, ग्रामपंचायतीच्या जागा किंवा भाड्याच्या खोल्यांमध्ये भरविल्या जात आहेत. त्यामुळे या अंगणवाड्यांना स्वतंत्र व सुरक्षित इमारती मिळाव्यात यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

एका अंगणवाडीच्या बांधकामासाठी साधारण ११ लाख २५ हजार रुपये खर्च येत असून आदिवासी भागातील अंगणवाड्यांसाठी १२ लाख ३० हजार रुपयांपर्यंत निधी मंजूर केला जात आहे. यापूर्वी प्रति अंगणवाडी केवळ ८ लाख ५० हजार रुपये निधी मिळत होता. मात्र डीपीडीसीने वाढीव निधी दिल्याने आता अधिक दर्जेदार बांधकाम शक्य होणार आहे.

२०२५-२६ च्या नियोजनातून डीपीडीसीने सुरुवातीला ९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर पुनर्नियोजनातून आणखी ५.५० कोटी रुपये उपलब्ध झाल्याने कामांना अधिक गती मिळणार आहे.

दरम्यान, उर्वरित ७१ अंगणवाड्यांसाठी सुमारे ८ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतकुमार भदाणे यांनी सांगितले. आगामी २०२६-२७ च्या नियोजनात यासाठी विशेष तरतूद करण्याबरोबरच काही जुन्या अंगणवाड्यांच्या दुरुस्तीची कामेदेखील हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


 

 

Tags: anganvadyana milnar hakkache chat news
Previous Post

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

Next Post

पाचोऱ्यात भररस्त्यात शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

पाचोऱ्यात भररस्त्यात शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील
1xbet russia

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

August 20, 2026
1xbet russia

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

August 20, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

August 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon