पाचोरा(प्रतिनिधी)-पाचोरा पंचायत समिती शिक्षण विभाग व जिल्हा परिषद अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा तसेच गो गर्ल्स गो मोहिमे अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा येथील गो. से. हायस्कूलमध्ये झाल्या.
यापूर्वी स्पर्धा शालेय स्तरावर व केंद्र स्तरावर आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात पाचोरा तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत सर्व शाळा सहभागी झालेल्या होत्या. तालुकास्तरीय स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती वसंत गायकवाड, उपसभापती रत्नप्रभा पाटील, सदस्य ज्ञानेश्वर सोनार, पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील, सुभाष पाटील, गटशिक्षण अधिकारी विकास पाटील, गट विस्तार अधिकारी समाधान पाटील, सरोज गायकवाड, खलील देशमुख यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य दिपकसिंग राजपुत तसेच गो. से. हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. डी. पाटील, पर्यवेक्षक आर. एल. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. स्पर्धा समिती प्रमुख म्हणून एन. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी, खो-खो, लिंबू चमचा, लंगडी, 30 मीटर, 100 मीटर, तसेच 200 मीटर धावणे या स्पर्धा झाल्या.
स्पर्धांमधील विजेते
मुलांच्या लिंबू चमचा खेळात जि. प. शाळा सामनेरचा हितेश साळुंखे (प्रथम), मुलींमध्ये जि. प. शाळा सार्वे खु ची नंदनी पाटील (प्रथम), तीस मीटर धावणे मुलांमध्ये जाकिर काकर मुलींमध्ये जि. प. शाळा शिंदाड ची श्रावणी कोठावदे (प्रथम), 100 मीटर धावणे मुलांमध्ये जि. प. शाळा अंतुर्ली बु चा अनिल पवार (प्रथम), 100 मीटर धावणे (6 ते 9 वयोगट) मुलांमध्ये जि. प. शाळा माहेजी चा पवन मिस्तरी (प्रथम), मुलींमध्ये जि. प. शाळा कुरंगी येथील पल्लवी गुरव (प्रथम), 100 मीटर धावणे (10 ते 13 वयोगट) खाजगी आश्रम शाळा, वरसाडे तांडा सुजाता माळोचे (प्रथम), 100 मीटर धावणे (14 ते 18 वयोगट) आदर्श माध्यमिक विद्यालय, कुर्हाड तेजस्विनी चौधरी (प्रथम), इयत्ता तिसरी व चौथी लंगडी मध्ये जि. प. शाळा सामनेर मुले विजयी, जि. प. शाळा लासगाव (उर्दू) मुली विजयी, इयत्ता पाचवी ते आठवी लंगडी मुलांमध्ये जि. प. शाळा आसनखेडा (प्रथम), मुलींमध्ये जि. प. शाळा लासगाव (उर्दू) (प्रथम), इयत्ता तिसरी व चौथी गट क्रमांक – 2 मध्ये कबड्डी जि. प. शाळा राजुरी (प्रथम), गट क्रमांक 3 मध्ये कबड्डी जि. प. शाळा कुर्हाड (प्रथम), मुलीं मध्ये जि. प. शाळा कुर्हाड (खुर्द) (प्रथम), खो-खो गट क्रमांक 2 मध्ये मुले जि. प. शाळा वडगाव कडे (प्रथम), तर मुलींमध्ये जि. प. शाळा राजुरी (प्रथम), गट क्रमांक 3 मध्ये मुले जि. प. शाळा कुर्हाड (प्रथम) तर गट क्रमांक 3 मध्ये मुली जि. प. शाळा कुर्हाड (प्रथम) याप्रमाणे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कौशल्य दाखत यश संपादन केले.