जळगाव(प्रतिनिधी) – एप्रिल ते जून, 2020 या कालावधीत मुदत संपणा-या व नव्याने स्थापित सुमारे 1570 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील मस्कावर सीम व मस्कावद खुर्द या दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सार्वत्रिक निवडणुकीकरीता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे- तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्दी करण्याचा दिनांक 27 फेब्रुवारी, 2020 (गुरुवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ 6 मार्च, 2020 ( शुक्रवार) ते दिनांक 13 मार्च 2020 (शुक्रवार) वेळ सकाळी 11 ते दुपारी तीनपर्यंत, (दिनांक 8 मार्च 2020 चा रविवार व दिनांक 10 मार्च 2020 ची सार्व सुट्टी वगळून), नामनिर्देशपत्रे छाणनी करण्याचा दिनांक व वेळदिनांक 16 मार्च, 2020 (सोमवार) वेळ सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ दिनांक 18 मार्च, 2020 (बुधवार) दुपारी 3.00 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ दिनांक 18 मार्च, 2020 (बुधवार) दुपारी 3.00 वाजेपर्यंत. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 29 मार्च, 2020 (रविवार) सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यत, मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिक-यांच्या मान्येतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) 30 मार्च, 2020 (सोमवार), जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 4 एप्रिल, 2020 (शुक्रवार) पर्यत राहील. असे किरण कुरुंदेकर, सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.