पाचोरा (प्रतिनिधी) – कंत्राटी पदावर नगरपालिकेत कार्यरत एका २५ वर्षीय तरुणाने आज १४ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या
केल्याची घटना शहरात उघडकीस आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि पाचोरा शहरातील जवाहर हौसिंग सोसायटी येथील रहिवाशी असलेल्या अनिल बागुल (वय – २५) हा तरुण पाचोरा नगरपालिकेत कंत्राटी पदावर काम करीत असून आज त्याने रविवारी १४ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविले. हा प्रकार बाजुच्या खोलीत असलेल्या त्यांच्या परिवाराच्या लक्षात येताच परिवारातील सदस्यांनी एकच आक्रोश केला .
नातेवाईकांनी अनिल बागुल यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी अनिल बागुल यांना मृत
घोषित केले. घटनेबाबत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत अनिल बागुल यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी,
एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.