• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिंदे सरकारच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

गिरीश महाजन यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास तर गुलाबराव पाटील यांच्याकडे पुन्हा पाणीपुरवठा खाते

जळगाव (प्रतिनिधी) – राज्यात एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यांच्या सरकारमधील १८ मंत्र्यांनी कॅबिनेट पदाची शपथ देखील घेतली आहे. मात्र मंत्र्यांना खाते वाटप झाले नव्हते. रविवारी १४ ऑगस्ट रोजी खाते वाटपाची यादी राजभवनात सादर झाली आणि ती मंजूर देखील झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांना पूर्वीचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन खाते आणि ग्रामविकास तर दुसरे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांना पूर्वीचेच खाते पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री हे कायम राहिले आहे. गृहमंत्री पद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास मंत्री पद कायम आहे.

यादीनुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, शहर विकास, माहिती आणि तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, वाहतूक, मार्केटिंग, सामाजिक न्याय, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, पर्यावरण आणि वातावरण बदल, अल्पसंख्यांक आणि औकाफ मंडळ मंडळ तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ व वित्त नियोजन, विधी विभाग, ऊर्जा खाते, गृहनिर्माण हे खाते आले आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, पशु व दुग्ध संवर्धन विभाग, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन, सांस्कृतिक, मत्स्य विकास हे विभाग, चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री तर विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास हे खाते आले आहे.

गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामीण विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण व संशोधन आणि क्रीडा व युवक कल्याण विभाग, गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता खाते, दादा भुसे यांच्याकडे खार बंदरे आणि खाणकाम, संजय राठोड यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, सुरेश खाडे यांच्याकडे कामगार खाते, संदिपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना व फलोत्पादन, उदय सामंत यांच्याकडे उद्योग खाते, तानाजी सावंत यांच्याकडे आरोग्य व कुटुंबकल्याण खाते, रवींद्र चव्हाण यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अब्दुल सत्तार कृषी मंत्री, दीपक केसरकर शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विकास, अतुल सावे यांच्याकडे इतर मागासवर्गीय आणि बहुजन विकास, शंभूराजे देसाई यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पर्यटन कौशल्य विकास व उद्योजकता आणि महिला व बालविकास हे खाती देण्यात आले आहे.


 

 

Tags: # jalgaon gulabrav devkar korona positive news #maharashtra
Previous Post

पाचोरा पालिकेतल्या कंत्राटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

Next Post

जळगावात तरुणाची दुचाकी लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात तरुणाची दुचाकी लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह
खान्देश

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
जैन कंपनी

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे जागतिक संधिवात दिनानिमित्त व्यायाम सत्राचे आयोजन
खान्देश

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 13, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमेन्समध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ उत्साहात
खान्देश

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात ” फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६ ” उत्साहात संपन्न !

October 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon