• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तोतया पोलिस सांगत वृद्धाच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या लांबविल्या

पाचोरा शहरातील दत्त काॅलनी भागातील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 31, 2023
in Uncategorized
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पोलिस असल्याची खोटी बतावणी करुन शहरातील एका सेवानिवृत्त वृद्धाच्या हातातील ३९ हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरुन नेवुन घटनास्थळा वरुन पोबारा केला. घटने प्रकरणी पाचोरा पोलिसात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, शहरातील सानेगुरुजी काॅलनीतील सेवानिवृत्त रहिवाशी भिवराव भाऊराव पाटील (वय – ७९) हे ३० जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौकातील हार्डवेअर दुकानात उधारीचे पैसे देण्यासाठी त्यांच्या स्कुटीने गेले होते. दरम्यान १:३० वाजेच्या सुमारास खाजगी कामासाठी एम. एम. महाविद्यालयाच्या पाठीमागील दत्त काॅलनी परिसरातुन जात असतांनाच विनानंबर मोटरसायकलने दोन अनोळखी इसमानी भिवराव पाटील यांना थांबवुन आम्ही पोलिस आहोत. तुमच्या परिसरात फसवणुकीच्या व चोरीच्या घटना घडत आहेत. आम्हाला साहेबांनी पेट्रोलिंगसाठी पाठविले आहे. अशी बतावणी करून त्यांचे जवळील लाल रंगाचा हात रुमाल काढत भिवराव पाटील यांच्या हाताच्या बोटात असलेल्या ३० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व ९ हजार रुपये किंमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी अशा दोन अंगठ्या रुमालात बांधण्याचे नाटक करत सदरील रुमाल भिवराव पाटील यांच्या कडे दिला. व घटना स्थळावरुन पोबारा केला. काही वेळानंतर भिवराव पाटील यांनी रुमाल बघितला असता दोन सोन्याच्या अंगठ्या आढळुन आल्या नाही. तेव्हा भिवराव पाटील यांना लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे. भिवराव पाटील यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत पोलिसांना आपबिती सांगितली. भिवराव पाटील यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. सुनिल पाटील हे करीत आहे.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाचोऱ्यात नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ५६.५७ टक्के मतदान

Next Post

मणियार विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिराचे उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मणियार विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिराचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव
Uncategorized

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शासकीय कामात अडथळा आणत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण

August 13, 2026
ऑपरेशन ३/२५’ ने जळगाव हादरले!
1xbet russia

ऑपरेशन ३/२५’ ने जळगाव हादरले!

August 13, 2026
तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी
Uncategorized

लघवी करण्यास विरोध केला म्हणून तरुणावर लाकडी काठीने हल्ला

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

जळगावात १२ ते १६ ऑगस्टदरम्यान पर्यावरण महोत्सव

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

शासकीय कामात अडथळा आणत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon