• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुलीचं होत असल्याच्या कारणावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्ह्यातील पाचोरा येथे पत्नी आणि तीन मुलींसह राहणाऱ्या पतीने आपल्या पत्नीला मुलीचं होत असल्याच्या कारणावरून खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा आज जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती की,पाचोरा येथील विवेकानंद नगर तांडा येथे आरोपी पप्पु रतन पवार उ.व.३१ हा त्याची मयत पत्नी कस्तुरबाई उ.व.३० व त्यांच्या तीन मुलींसह राहत होता.आरोपी पप्पु पवार हा पाचोरा येथेच एक हॉटेलवर कामाला होता,त्याला दारू पिण्याचे सुद्धा व्यसन होते.दि.०९/०६/२०१९ रोजी रात्री कस्तुराबाईला मुलीच होता या व दारूच्या कारणाने आरोपीने कस्तुरबाईशी भांडण करून तिला शिवीगाळ केली व लाकडी दांड्याने डोक्यात मारले त्यामुळे ती खाली पडली,त्यानंतर आरोपीच्या घराच्या शेजारी राहणारे त्याचे भाऊ व वहिनीने पाचोरा येथील रुग्णालयात घेऊन गेले परंतु त्याठिकाणी तिला मयत घोषित करण्यात आले.
सदर घटनेची फिर्याद मयताची आई पद्मबाई सखाराम राठोड उ.व.६० रा.आनंद नगर तांडा ता.एरंडोल हिने पाचोरा पोलीस स्टेशनला भा.द.वि.कलम ३०२,५०४ अन्वये गु.र.नं.२३७/१९ ला आरोपी पप्पु रतन पवारचे विरुद्ध दिली.
आरोपीला या गुन्ह्याचे कामी दि.१०/०६/२०१९ रोजी अटक करण्यात आली.सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक पंकज शिंदे यांनी केले.आरोपीच्या विरुद्ध प्रथम दर्शनी पुरावा दिसुन येत असल्यामुळे आरोपीच्या विरुद्ध दोषारोप दाखल करण्यात आले.
आरोपीच्या विरुद्ध सदरचा खटला सर्वप्रथम तत्कालीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जि.ए.सानप याच्या समोर चालले.त्यांच्या समक्ष या खटल्याचे कामी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी आठ साक्षीदार तपासले,परंतु त्यांची बदली झाल्यामुळे व त्यानंतर कोरोनाच्या निर्बंदामुळे सदर खटला पुढे चालु शकला नव्हता,परंतु त्यानंतर डिसेंबर २० मध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमालानी यांच्या समोर सरकार पक्षाने उर्वरित दोन साक्षीदार तपासून ह्या खटल्याचे कामी पुरावा ठेवण्याचे काम पूर्ण केले.

गौरीची साक्ष ठरली महत्वपूर्ण
या खटल्याचे कामी जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी एकूण १० साक्षीदार तपासले.यात प्रामुख्याने आरोपीची मोठी मुलगी कु.गौरी हिची साक्ष महत्वपुर्ण ठरली कारण ही सर्व घटना तिच्या समोर घडलेली असल्यामुळे तिने सर्व घटनाक्रम जसाचा तसा न्यायालयासमोर संगीतला व घटना करणारा व्यक्ती कोण आहे असे विचारले असता तिने तिच्या वडिलांकडे म्हणजेच आरोपिकडे बोट दाखवले.या व्यतिरिक्त स्वतः फिर्यादी पद्मबाई राठोड,डॉ. निलेश देवराज पंच साक्षीदार व पो.उ.नि.पंकज शिंदे यांच्या साक्षी महत्वाच्या झाल्यात.
आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमालानी यांनी कस्तुरबाई पवार हिचा खून केला म्हणून तिचा पती पप्पु रतन पवार याला दोषी ठरवून जन्मठेपेची व ५,०००/- दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली.दरम्यान गुन्हा घडल्यानंतर अटक झाल्यापासून आरोपी पती पप्पु पवार हा कारागृहातच होता.आज न्यायालयाने सदरची शिक्षा व्हिडिओ कॉन्फरन्स वर सुनावणी घेऊन ठोठावली.


 

 

Previous Post

आपल्या बचत खात्यातून मे महिन्यात 330 रुपये कट केले जात आहेत, यामागील कारण काय आहे ते जाणून घ्या

Next Post

सांगलीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्यामुळे महिलेची आत्महत्या ; प्रियकरावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सांगलीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्यामुळे महिलेची आत्महत्या ; प्रियकरावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon