• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निंभोरा राज येथील तिघा मुलांसह महिलेचा नदीत बुडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2020
in क्राईम, महाराष्ट्र
0

अमरावती (वृत्तसंस्था) – जिल्ह्यातील निंभोरा राज (ता. धामणगाव) येथील तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला असून त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एक महिला देखील मृत्यूमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

धामणगाव तालुक्यातील निंभोरा राज येथील चंद्रभागा नदी पात्रात बुडून तीन मुले आणि मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. निंभोरा राज येथील पुष्पा चवरे यांनी आज एकादशी निमित्त पूजा केली होती. पुजेचे साहित्य पाण्यात अर्पण करण्याकरीता पुष्पा या आपल्या मुलांसोबत गावाशेजारच्या चंद्रभागा नदीवर गेल्या होत्या. त्यावेळी तीनही मुले अंघोळीसाठी नदी पात्रात उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्याच्या मुख्य प्रवाहात गेली आणि नदी पात्रातील खड्ड्यामध्ये बुडाली. त्यांना वाचविण्यासाठी पुष्पा चवरे या नदी पात्रात उतरल्या, मात्र त्यांचाही बुडून मृत्यू झाला आहे. यात यश प्रमोद चवरे (११), जीवन प्रदीप चवरे (१५), सोहम दिनेश झेले (१२), असे मृत चिमुकल्यांचे व पुष्पा दिलीप चवरे (३२), असे मृत महिलेचे नाव आहे. तर, बेबी प्रदीप चवरे (३५), राधा गोपाळराव मलीये (३८) यांची प्रकृती चिंताजनक आहे.

ही घटना घडली त्यावेळी नदीपात्रावर उपस्थित असलेल्या इतर दोन महिलांनी या चौघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले. यामध्ये त्या दोन्ही महिला अत्यवस्थ झाल्या आहेत. यातील एका महिलेला अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर अन्य एका महिलेवर धामणगाव रेल्वे येथील शासकीय रुग्णालयत उपचार सुरू आहेत.

निभोरा गावाच्या बाजूनेच समृद्धी महामार्ग जात आहे. या मार्गाच्या कामासाठी नदीत अवैधरित्या खोलीकरण करण्यात आले आहे. नदीच्या पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. मात्र, नदीच्या पात्रात प्रचंड पाणी असल्याने हे खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे या खड्ड्यात बुडून माय लेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे.


 

 

Previous Post

बेंडाळे चौकात तरुणाला बाटल्यांनी मारहाण

Next Post

राऊत-फडणवीस भेटीनंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राऊत-फडणवीस भेटीनंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाल्याचे सांगितल्याचा राग; जळगावात प्रौढाच्या डोक्यात दगड घातला

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जळगावात रद्दीच्या गोडाऊनवर तरुणाचा प्राणघातक हल्ला; वडिलांसोबतच्या वादातून चाकू अन् दगडाने वार

August 8, 2026
डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात
1xbet russia

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश निश्चित; यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

फुलगाव शिवारात १ लाख रुपयांची १.२ किमी लांबीची वीज तार लांबवली

August 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाल्याचे सांगितल्याचा राग; जळगावात प्रौढाच्या डोक्यात दगड घातला

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात रद्दीच्या गोडाऊनवर तरुणाचा प्राणघातक हल्ला; वडिलांसोबतच्या वादातून चाकू अन् दगडाने वार

August 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon