• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एकाच दिवशी २४ लाख वीजबिल भरून १३ शेतकरी थकबाकीतून मुक्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 28, 2021
in जळगाव
0

महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकांच्या हस्ते सत्कार

जळगाव ( प्रतिनिधी ) – महावितरणच्या महाकृषी ऊर्जा अभियानात ६६ टक्के सूट मिळविण्याच्या संधीचा लाभ घेत सावदा येथे १३ शेतकऱ्यांनी गुरुवारी २४ लाखांचे वीजबिल भरून थकबाकीतून मुक्त होण्याचा मान मिळविला. महावितरणचे प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांच्या हस्ते या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रसाद रेशमे यांनी जळगाव, नशिराबाद, भुसावळ, मुक्ताईनगर, सावदा येथे भेट देऊन थकबाकी वसुलीसह कामकाजाचा आढावा घेतला. कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी महाकृषी ऊर्जा अभियानातून उपलब्ध आहे. या योजनेत वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन करून बिल भरण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.

त्यानंतर रावेर व यावल तालुक्यातील १३ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी २४ लाख रुपयांचे वीजबिल भरले . अनिता चौधरी, विलास चौधरी, यादवराव पाटील, लक्ष्मण चौधरी, बाबुलाल गुप्ता, हिरामण बोंडे, गोविंदा इंगळे, गुणवंत नेमाडे, संजय पाटील, कविता राणे, भगवान पाटील, पंडितराव चौधरी व डिगंबर पाटील अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत

यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधीक्षक अभियंता फारूक शेख, कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे, उपविभागीय व कक्ष अभियंत्यांसह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रसाद .रेशमे म्हणाले की, कृषिपंप वीजबिलांच्या वसुलीतून ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. हा निधी त्या-त्या ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्या यासह वीज वितरण व उपकेंद्रातील विविध यंत्रणेचे पायाभूत सक्षमीकरण करण्यात येत आहे.

महावितरणची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता वीजबिलांच्या थकबाकी वसुलीशिवाय पर्याय नाही. प्रत्येक युनिटच्या वसुलीसाठी प्रयत्न करावे, असे निर्देश रेशमे यांनी यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.


 

 

Previous Post

नाशिकच्या व्यापाऱ्यांनी केली माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

Next Post

जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी अवैध ठरलेल्या ८ जणांचे अपील फेटाळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी अवैध ठरलेल्या ८ जणांचे अपील फेटाळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon