जळगाव(प्रतिनिधी)- ग्राहकांना नेहमी आगळीवेगळी भेट देणं आणि त्यांच्या लाइफस्टाईलला नवी उंची देण्याचं काम गेल्या 4 वर्षांपासून सरस्वती फोर्ड समूह करीत आहे. या वेळी सुद्धा फोर्डने नवीन BS -VI प्रणालीने परिपूर्ण अशा न्यु फोर्ड फिगो, न्यु फोर्ड फ्रीस्टाईल, न्यु फोर्ड अस्पायर, न्यु फोर्ड इकोस्पोर्ट, न्यु फोर्ड इंडिव्हर या नवीन गाड्यांचा लॉन्चिंग सोहळा दिनांक 1 मार्च रविवार रोजी सायंकाळी 5:30 वाजता सरस्वती फोर्ड, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

नवीन BS -6 प्रणालीच्या कार्सची काही खास वैशिष्ट्य
BS -VI हि प्रणाली पर्यावरणपूरक असून चालकांसाठी नवीन अनुभव व उंची प्राप्त करून देते या प्रणालीमध्ये कॅथलिक कॅनव्हर्टर असून कारला स्मूथनेस प्राप्त करून देते तसेच या प्रणालीमुळे कारमधील केबिन नॉईस व व्हायब्रेशन कंट्रोल करून नवीन आनंद देते. प्रदूषणाला सुद्धा आळा बसेल.
BS -VI प्रमाणित कार्स या सक्षम व परिपूर्ण पेट्रोल व डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध असून वेळोवेळी नावीन्यतेचा अनुभव करून देत असते.या मध्ये नवीन Fordpass application द्वारे कार मोबाइलवरून लॉक / अनलॉक करणे , लोकेशन ट्रेस करणे, कारची स्पीड तपासणे, मोबाइल द्वारे कार स्टार्ट आणि स्टॉप करणे (ऑटोमॅटिक कारसाठी), टचस्क्रीन इंफोटेंमेंट, नेव्हिगेशन, अशा कधीही न बघितलेल्या फीचर्स चा समावेश या प्रणाली मध्ये आहे.
सुरक्षितता:- फोर्ड कंपनी नेहमीच ग्राहकांच्या सुरक्षिततेचा विचार करत असते म्हणूनच कार्स मध्ये 6 एअर बॅग्स व इमर्जन्सी असिस्ट असून फक्त चालकाचं नव्हे तर कारमध्ये बसलेल्या प्रवाशांनासुद्धा सुरक्षितता प्राप्त करून देते. ऍक्टिव्ह रोल प्रोटेक्शन (-RP), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), कार रोल होऊन अपघात होऊ नये म्हणून (HL-), तसेच न्यू इंडिव्हर मधील टेरेन मॅनेजमेंट सिस्टीम ची फीचर्स थक्क करणारी आहेत.
जळगाव जिल्ह्यातील कारप्रेमींनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सरस्वती फोर्डचे संचालक धवलजी टेकवाणी यांनी केले आहे. आटोमोबाईल विश्वात फोर्डच्या सर्वच गाड्या अत्यंतआकर्षक,सुंदर, आरामदायी असून, सुरक्षितता हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सेफ्टीमे तो हम सबके बाप है यामुळेच सरस्वती फोर्ड हे गेल्या चार वर्षापासून दिवसेंदिवस प्रगतीचे शिखर गाठत आहे. आज फोर्ड परिवारात दोन हजाराहून अधिक ग्राहकांची भर पडली आहे.
1951 मध्ये नवीपेठ जुन्या कन्या शाळेच्या गल्लीत, सरस्वती डेअरी नावाचे छोटेसे रोपटे लावले तो आज सरस्वती डेअरी, सरस्वती फोर्ड व सरस्वती एन्टरप्राईजेस मिळून पाच जिल्ह्यात महाकाय वृक्ष बनला आहे.
फोर्डच्या नवीन गाड्यांचे लॉन्चिंग दरवर्षीच होत असून या वर्षी फोर्डच्या तब्बल पाच गाड्यांचे लॉन्चिंग ही ग्राहकांकरिता खास पर्वणी आहे.
ग्राहकांच्या सेवेत नेहमी सज्ज असलेल्या फोर्ड कंपनीने ग्राहकांना परवडेल अशा किंमतीत, जास्त मायलेजसह, नवीन गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. नवीन गाड्यांचे बुकींग काही हौशी ग्राहकांनी पूर्वीच करून ठेवले आहे. गुडीपाडवाकरिता सुध्दा ग्राहकांनी नवीन गाड्यांचे बुकींग केले आहे.
