जळगाव (प्रतिनिधी) भरधाव कारला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरचा ब्रेक दाबताच ट्रालीचा हुक तुटल्याने ट्रॅक्टर पलटल्याने ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, 28 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रॅक्टर चालक दीपक जगन्नाथ महाजन (30, अंजळगाव) याचा मृत्यू झाला.
विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ हा अपघात झाला आहे. दीपक महाजन हे ट्रॅक्टर (क्रमांक एमएच. 19 बी.जी. 5237) घेवून हे चुलतभाऊ मोहन महाजन यांच्यासह ममुराबाद येथून चारा घेवून परतत असताना कवयीत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ समोरून भरधाव वेगाने येणारी कारवर अन्य कारवर आदळल्याने दीपक यांनी ट्रॅक्टरचा अचानक ब्रेक दाबल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीचा हुक तुटून ती उलटली तसेच ट्रॅक्टरही उलटल्याने इंजिनाच्या खाली दबला गेल्याने दीपकचा जागीच मृत्यू झाला. मयत दीपकच्या पश्चात पत्नी भावना, पाच वर्षांचा मुलगा लकी, दीड वर्षांचा मुलगा हितेश, भाऊ देवानंद, आई वत्सलाबाई आणि वडील जगन्नाथ असा परीवार आहे.