नवी मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागण्यानंतर, पनवेल महानगरपालिका हद्दीत, कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. हा रुग्ण दुबई येथून कमोठे वसाहतीमध्ये आला होता. नंतर त्याला ताप, सर्दी खोकला या सारखे लक्षणे आढळून आले. त्याची तपासणी केली असता तो पॉझिटीव्ह निघाला होता. त्या नंतर या रुग्णांवर मुबई येथील कस्तुरबा येथे उपचार सुरू होते. उपचारा नंतर हा रुग्ण बरा झाला आहे.
यासोबतच अमेरिकेमधून आलेला दुसरा रुग्ण देखील पॉझिटीव्ह आढळून आला होता. तो देखील आता बरा झाल्याचे सांगितले जात आहे. हे दोन्ही रुग्ण बरे झाल्यानंतर कामोठे वसाहत ही कोरोना मुक्त झाली आहे. मात्र कामोठे कोरोना मुक्त झाला म्हणून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर येऊ नये प्रशासनाला असेच सहकार्य करून राज्य सरकारचे नियम तंतोतंत पाळावे आणि कोरोना सारख्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरा बाहेर न पडून मदत करूया असे आवाहन पनवेल पालिकेने केलं आहे.