मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना बाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील 5 डॉक्टरांसह 15 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोनामुळे दगवलेला 68 वर्षीय रुग्ण 4 एप्रिलला शासकीय मेयो रुग्णालयात दाखल झाला होता. 5 एप्रिलला मृत्य झाल्यावर 6 एप्रिलला त्याचा कोरोना अहवाल पोजिटिव्ह आला. ज्यामुळे त्याच्यावर तो दाखल करण्यापासून संपर्कात आलेले मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यासह 5 निवासी डॉक्टर,5 नर्सेस व 5 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली असली तरीही या सर्वांना पुढील 14 दिवस विलकरणातच राहावे लागणार आहे. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबीय व संपर्कात आलेल्या 17 व्यक्तींची देखील तपासणी करण्यात आली आहे.