• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

लोकसभा निवडणुकीत जळगावपेक्षा रावेर मतदारसंघात मतदानाची सर्वाधिक टक्केवारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 14, 2024
in जळगाव, रावेर
0
लोकसभा निवडणुकीत जळगावपेक्षा रावेर मतदारसंघात मतदानाची सर्वाधिक टक्केवारी

भाजप आमदारांच्या मतदारसंघात कमी तर काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील अंतिम मतदान टक्केवारी प्राप्त झाली आहे. त्यानुसार जळगाव लोकसभा मतदारसंघात एकण सरासरी ५७.७०% तसेच रावेर मतदारसंघात एकूण सरासरी ६३.०१ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. विधानसभानुसार लक्षात घेता भाजप आमदारांच्या मतदार संघातील मतदानाची टक्केवारी कमी झाली असून शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात समाधानकारक स्थिती आहे. काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघात मतदानाची सर्वाधिक टक्केवारी आहे.

जळगाव व रावेर दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी दि.१३ मे रोजी मतदान घेण्यात आले. मतदानामध्ये सकाळच्या प्रहरात नागरिकांचा मोठा उत्साह दिसला. नंतर दुपारून चार वाजेनंतर गर्दी उसळलेली दिसून आली. प्रशासनाकडून स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी हे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सातत्याने नागरिकांना आवाहन करीत होते. जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात १९ लाख ९४ हजार ४६ मतदारांपैकी ११ लाख ५० हजार ५३६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. १० लाख ३७ हजार ३५० पुरुषांपैकी ६ लाख २१ हजार ५६३ पुरुषांनी तर ९ लाख ५६ हजार ६११ महिलांपैकी ५ लाख २८ हजार ९५४ महिलांनी मताधिकार बजावीला. ८५ तृतीयपंथियांपैकी १९ तृतीयपंथी यांनी मतदान केले. एकूण ५७.७० % मतदान जळगाव लोकसभा मतदारसंघात झाले.

तर रावेर लोकसभा मतदारसंघात १८ लाख २१ हजार ७५० मतदारांपैकी ११ लाख ४७ हजार ९६५ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ९ लाख ४१ हजार ७३२ पुरुषांपैकी ६ लाख ८ हजार १५९ पुरुषांनी तर ८ लाख ७९ हजार ९६४ महिलांपैकी ५ लाख ३९ हजार ७९६ महिलांनी मताधिकार बजावला. ५४ तृतीयपंथियांपैकी १० जणांनी मतदान केले.

विधानसभा मतदारसंघ निहाय टक्केवारीचा विचार केला तर भाजपच्या जिल्ह्यातील चौघा आमदारांच्या मतदारसंघात कमी मतदान झाल्याचे दिसून आले आहे. यात गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात 60.18%, संजय सावकारे यांच्या भुसावळ मतदारसंघात 57.33, सुरेश उर्फ राजू मामा भोळे यांच्या जळगाव शहर मतदार संघात 52.50 तर मंगेश चव्हाण यांचे चाळीसगाव येथे 55.01 असे मतदान झाले आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात समाधानकारक टक्केवारी आहे. यात लता सोनवणे यांच्या चोपडा मतदारसंघात 61.52, गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात 62.60, चिमणराव पाटील यांच्या एरंडोल-पारोळा मतदारसंघात 61.76 तर किशोर पाटील यांच्या पाचोरा येथे 59.82 असे मतदान झाले आहे.

याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांच्या अमळनेर मतदारसंघात 55. 94, अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात 64.56 मतदान टक्केवारी असून सर्वाधिक टक्केवारी काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघात आहे. यावल-रावेर या शिरीष चौधरी यांच्या मतदारसंघात 67.77 तर राजेश एकडे यांच्या मलकापूर मतदारसंघात 67.36% इतके मतदान झालेले आहे.

*जळगाव लोकसभा मतदारसंघ- विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी*
▪️ जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ –52.90 %
▪️ जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ –62.60 %
▪️ अमळनेर विधानसभा मतदारसंघ –55.94 %
▪️ एरंडोल विधानसभा मतदारसंघ –61.76 %
▪️ चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –55.01 %
▪️ पाचोरा विधानसभा मतदारसंघ -59.82 %

*रावेर लोकसभा मतदारसंघ- विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी*
▪️ चोपडा विधानसभा मतदारसंघ –61.52 %
▪️ रावेर विधानसभा मतदारसंघ –67.77 %
▪️ भुसावळ विधानसभा मतदारसंघ –57.33 %
▪️ जामनेर विधानसभा मतदारसंघ –60.18 %
▪️ मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ –64.56 %
▪️ मलकापुर विधानसभा मतदारसंघ – 67.36 %


Previous Post

जिल्हा निवडणूक प्रशासनाचे जनजागृतीचे प्रयत्न ; मतदारांची सकारात्मक साद

Next Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात अवतरल्या फ्लोरेन्स नाइटिंगेल,जागतिक परिचारीका दिन उत्साहात 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात अवतरल्या फ्लोरेन्स नाइटिंगेल,जागतिक परिचारीका दिन उत्साहात 

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात अवतरल्या फ्लोरेन्स नाइटिंगेल,जागतिक परिचारीका दिन उत्साहात 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025
बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon