नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी आणि अभिनेत्री इशा देओल मागच्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली. पहिली मुलगी राध्यानंतर 2 ऑक्टोबर 2019 ला मिरायाचा जन्म झाला. आपल्या दोन्ही मुलींच्या जन्मानंतर इशा बॉलीवूडपासून दूर आहे. सध्या ती तिचं मातृत्व एन्जॉय करत आहे. पण दुसऱ्यांदा आई झाल्यावर इशा अशा एक गंभीर आजाराची शिकार झाली होती. याबाबत हेमा मालिनी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली. मिरायाच्या जन्मानंतर इशा देओल डिप्रेशनची शिकार झाली होती.
हेमा मालिनी सांगतात, बाळंतपणानंतर एका स्त्री फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि भावनिक बदलांनाही सामोरी जात असते. काही स्रिया डिलिव्हरीनंतर पोस्टपार्टम डिप्रेशनचा बळी ठरतात. पण अनेकदा त्यांना याबाबत माहिती सुद्धा नसते. इशा देओल सुद्धा या डिप्रेशनचा बळी ठरली होती.
पण आई हेमा मालिनीच्या सतर्कतेमुळे ती यातून सुखरुप बाहेर पडली आहे. याबद्दल इशा म्हणाली, हे प्रेग्नन्सीच्या वेळी झालेल्या हार्मोन्सच्या चढ-उतारामुळे प्रत्येक स्रीसोबत होते. ज्याला पोस्ट पार्टम डिप्रेशन असे म्हणतात. हा खरं तर खूप गंभीर आजार आहे. जर याबद्दल वेळीच तुम्हाला समजलं नाही, तर त्यामुळे तुम्हाला जीवही गमवावा लागू शकतो, असे तिने सांगितले.