खिचडी वाटपासाठी गेलेल्या तरुणांची रिक्षा उलटल्याने दोन तरुण ठार तर तीन जण जखमी
अमळनेर (प्रतिनिधी ) येथील काही तरुण कोरोना लोकडाऊन मुळे तालुक्यातील झाडी व मुडी गावाला अन्नदान करण्यासाठी गेले असता परत येत असताना मुडी गावा जवळ प्याजो रिक्षा पलटी झाल्याने दोन तरुण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील श्रीरामनगर, रामेश्वर काॅलनी परिसरातील सात-आठ तरुण कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊन काळात गोर-गरिबांना अन्नदान वाटप करण्यासाठी झाडी व मुडी गावाला गेले होते. मुडी येथून परतत असताना झाडी गावाजवळ त्यांची पॅजो रिक्षाने अचानक ब्रेक मारल्याने पलटी झाली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात ऋषीकेश उमेश शेटे, विशाल दिनेश पाटकरी नामक तरुण जागीच ठार झाले. तर जयेश रमेश पाटील हा गंभीर जखमी झाला असल्या कारणाने त्याला पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तर अक्षय नंदकुमार महाजन व चेतन राजेंद्र चौधरी हे दोघेही किरकोळ झाल्याने त्यांचा उपचार शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरू आहे.
या घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.