कोल्हापूर (वृत्तसंस्था) – जिल्ह्यातील शाहूवाडी येथील तीस वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. शाहूवाडी तालुक्यातील हा पहिला रूग्ण असून जिल्ह्यात पाचवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे. यामुळे आता जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्हा वैद्यकीय पथक येथील परिसरात रवाना झाले असून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींचा शोध सुरु आहे. मलकापूरपासून पावनखिंडीतकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक किलोमीटर अंतरावर उचलत या गावात हा पॉझिटिव्ह रूग्ण सापडाला आहे. मलकापूरपासून पांढरेपाणीकडे जाणाऱ्या मार्गावर उचत हे गाव आहे. संबंधित तरुण हा तबलिगच्या कार्यक्रमास दिल्लीस गेला होता. कोल्हापुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.