• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेर दंगलीत एका जणाचा मृत्यू ; ४८ तांची संचारबंदी लागू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

रावेर (प्रतिनिधी) – येथे काल रात्री शुल्लक कारणावरून दोन गटात झालेल्या दंगलीत एका इसमाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी त्याच्या घरात तो मृतावस्थेत आढळला.यशवंत मराठे (वय ४५) रा. संभाजी नगर असे या मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तिक्ष्ण हत्याराचे वार त्याच्या शरीरावर असल्याचे सांगण्यात आले. रावेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दंगलीच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरातील संचारबंदी ४८ तासांची करण्यात आली आहे.
रात्री उशिरापर्यंत शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. मयत इसम हा घरी एकटाच होता. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास तो मृतावस्तेत आढळल्याची खबर पोलिसांना मिळाली.
शिवाजी चौकात-मण्यार वाड्यातील जमावाने एकमेकांवर जोरदार दगडफेक करून भडकलेल्या जातीय दंगलीत तीन जण गंभीर जखमी झाले आहे. तर पाच मोटार सायकली, एक मॅजिक यात जाळल्या असून, पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळत नसल्याने हवेत तीन गोळ्या झाडून जमावाला काबूत आणले.
ही घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. प्रार्थना स्थळावरून आलेल्या जमावाने शिवाजी चौकात जोरदार दगडफेक झाल्याने, दोन्ही बाजूने तुफान दगड गोटे एकमेकांवर भिरकवल्याने जोरदार दंगल भडकली. यात संतप्त जमावाने शिवाजी चौकातील व बारी वाड्यातील पाच मोटार सायकली एक टाटा मॅजिक जाळून भक्ष्य केल्या.
येथील दिगंबर अस्वार यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार्थ दाखल केले आहे. ह्या घटनेचे लोण शहरातील संभाजी नगरात पसरले यात निलेश जगताप युवकांच्या डोक्यात रॉड टाकून जखमी केल्याने त्याच्यावर जळगाव येथे खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहे.
यानंतर जावेद सलीम शेख देखील सिंदखेड रस्त्यावर जखमी मिळून आल्याने नातेवाईक यांनी त्याला जळगाव येथे उपचारार्थ दाखल केले आहे. तो गंभीर जखमी झाला आहे.
यापूर्वी शिवाजी चौकात जमाव प्रक्षोभक असल्याने, पोलिसांना जुमानत नाही अशा स्थितीत सहा.पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून तीन गोळ्या झाडून जमावाला पांगवले. यावेळी जळणाऱ्या वाहनांना रावेर, सावदा अग्निशामक बंबानी आग आटोक्यात आणली, घटनास्थळी जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के, प्रांत अधिकारी डॉ.अजित थोरबोले, उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे दाखल झाले होते. आमदार शिरीष चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. रात्री १२ वाजता प्रांतअधिकारी यांनी ४८ तासासाठी संचार बंदी घोषित केली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. निंभोरा,सावदा, फैजपूर, आणि मुक्ताईनगर येथील पोलीस कर्मचारी अधिकारी दाखल झाले आहे.शहरात तणाव पूर्ण शांतता असून,मोठ्या प्रमाणात पोलीस कुमुक तैनात केली आहे.


 

 

Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

Next Post

कोरोनाच्या महाभयंकर संकटातून बाहेर पडण्यासाठी एकजुटीने कारवाई करण्याची आवश्यकता : शरद पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाच्या महाभयंकर संकटातून बाहेर पडण्यासाठी एकजुटीने कारवाई करण्याची आवश्यकता : शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon