गुवाहाटी (वृत्तसंस्था) – भारतीय रेल्वेने दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी हजारो पदांची भरती काढली आहे. दहावी, बारावी पास किंवा डिप्लोमा धारक रेल्वेतील विविध पदासाठी अर्ज करू शकतात. ही भरती पूर्व रेल्वेने 2792 अॅप्रेंटिस पदासाठी काढली आहे.
पदांची संख्या – 2792, कोणत्या विभागात किती पदांची भरती होईल, हावडा विभाग – 659, सियालदह विभाग – 526, मालदा विभाग – 101, आसनसोल विभाग – 412, कांचरापारा कार्यशाळा – 206, लिलुआ कार्यशाळा – 204, जमालपूर कार्यशाळा – 684, शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त मंडळामधून 10 वी किंवा समकक्ष परीक्षा पास करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची तारीख – उमेदवार 6 मार्च 2020 ते 5 एप्रिल 2020 पर्यंत विविध पदासाठी अर्ज करू शकतात., अर्जाची प्रक्रिया – रेल्वेच्या या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावेत.,परीक्षा फीस : – सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 100 रुपये तर, इतर वर्गातील उमेदवार आणि महिलांना कोणतेही नाही.