न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरस जगभरात प्रचंड वेगाने पसरत आहे. कोरोना व्हायरसचं संकट लक्षात घेता न्यूयॉर्कचे राज्यपाल ऍड्रयू कुओमो यांनी न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित केली आहे न्यूयॉर्कच्या न्यू रोशेल या भागात आतापर्यंत 23 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर वेस्टचेस्टर काउंटी येथे 57 जण कोरोनाने ग्रासले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरस आतापर्यंत 70 देशांमध्ये पोहोचला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव बघता अखेर न्यूयॉर्कच्या राज्यपालांनी आणीबाणी घोषित केली आहे. राज्यपालांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे.
ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणातात की, न्यू रोशेलमधील परिस्थिती भयानक आहे. कोरोना आजाराला बळी पडणाऱया रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येणं जरुरीचं आहे. कोरोनावर ताबा मिळवण्यास न्यूयॉर्कमधील स्थानिक आरोग्य विभाग कमी पडत आहे. त्यामुळे अतिरिक्त आरोग्य अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे.