जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना कडधान्य व डाळींचे सरपंचा शोभाताई सोनवणे यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेतील शिल्लक असलेला शालेय पोषण आहारातील तांदुळे, कडधान्ये आणि डाळीचे वाटप आज शाळेत करण्यात आले. यावेळी सरपंचा शोभाताई सोनवणे, शालेय व्यवस्थापन सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक गणेश बागुल यांच्याहस्ते नियोजनबध्द रित्या वाटप करण्यात आले. सध्या कोरोना विषाणूचा पार्श्वभूमीवर धान्य वाटप करतांना सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले. यावेळी तीन फुट अंतर ठेवून प्रत्येकाला धान्य वाटप करण्यात आले. सर्व प्रथम येणाऱ्या पालकांचे, विद्यार्थ्यांचे हॅण्डवॉशने हात धुऊन सॅनिटायझर लाऊनच त्यांना रांगेत सोडण्यात येत होते. पालकांना तोंडाला रुमाल किंवा मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले होते. सर्व पालकांना १ मिटर अंतरावर चौकोन आखून त्यात उभे राहण्याच्या सक्ता सूचना मुख्याध्यापकांमार्फत देण्यात आल्या होत्या. म.शिविअ रविकीरण बिर्हाडे व केंद्रप्रमुख डि.एन.ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी शाळेतील शिक्षक उपस्थित होते.