अमळनेर (प्रतिनिधी ) – मध्ये सुन्नी दावते इस्लामी या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शहरासह तालुक्यात कोरोना व्हायरस बाबत जनजागृतीचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. सविस्तर माहिती अशी की, आपला देश कोरोना कोविड 19 ह्या रोगातून मुक्त व्हावा म्हणून अमळनेर शहरात सुन्नी दावते इस्लामीच्या वतीने गल्ली गल्ली जाऊन लोकांमध्ये जनजागृतीचे कार्य केले जात आहे. या वेळी लोकांना घरात रहा,बाहर जाउ नका,वारांवर हाथ स्वच्छ करीत रहा,दोन व्यक्ती मध्ये योग्य तो अंतर ठेवा व प्रशासना मार्फत मिळण्याऱ्या सर्व सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान करण्यात येत आहे. त्यासाठी फ़याजोद्दीन शेख अहमद,अज़हर नूरी,सगीर अहमद,डॉ. फय्याज, इश्तियाक शेख,मोइन नूरी आदि परिश्रम घेत आहे.