मुंबई (वृत्तसंस्था) – इटली आणि स्पेनमध्ये थैमान घालणारा कोरोना आता अमेरिकेत ही थैमान घालत आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूमुळे 345 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर येथे 18000 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिकेत दर मिनिटाला 13 कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. अमेरिकेत कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 100000 वर गेली आहे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत आता अमेरिकेने चीन, इटली आणि स्पेनला ही मागे टाकलं आहे.वृत्तसंस्था एएफपीने जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीत, अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 18,000 ने वाढली आहे. 24 तासात येथे 345 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आता जगातील सर्वात जास्त कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अमेरिकेत कोरोनाचे 1,04,007 रुग्ण आतापर्यंत आढळून आले असून 1693 लोकांचा मृत्यू झाला आहे.