नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – सध्या जगभर वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिवनावश्यक वस्तुंचा तुटवटा निर्माण होत आहे. त्यात अनेक पाश्चिमात्य देशात टाॅयलेट पेपरचा तुटवटा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक पाश्चिमात्य देशांनी कागदाऐवजी पाणी वापरण्याला पसंती दर्शवली आहे. भारतासोबतच अर्जेंटिनासारख्या काही लॅटिन अमेरिकन देशांमध्ये आणि इटली, फ्रान्ससारख्या काही युरोपियन देशांमध्येही पाण्याचा वापर करतात. त्यामुळे तुटवटा निर्माण झाल्यावर सगळ्या देशांनी हीच पद्धत वापरण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, जगभरात कोरोनाचा सामना करण्यासाठी सगळे सज्ज आहेत. मात्र जिवनावश्यक वस्तुंंचा तुटवटा अजून वाढत गेला तर परिस्थिती सांभाळणं कठीण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळे देश एकत्र येत कसा कोरोनाचा सामना करतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.