नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – झोपेत असलेल्या 25 वर्षीय पत्नीला सर्पदंश करून हत्या केल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. महिन्याभराच्या कालावधीत दोन वेळा त्या महिलेला सापाने दंश केला होता. त्यामुळे मृत महिलेच्या कुटुंबीयांना तिच्या पतीवर संशय होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
पोलिसांच्या गुन्हे शाखेद्वारे या प्रकरणाचा तपास करण्यात आल्यानंतर यातून धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांन पथनमथिट्टा जिल्हातील अदूर येथे एका खासगी बँकेत कामाला असलेल्या महिलेचा पती सूरज आणि साप आणून देणार्या रसेलला व्यक्तीला अटक केली आहे.
महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना संपर्क केला होता. महिन्याभरापूर्वी मुलीला सापाने दंश केला होता, परंतु त्यातून ती बचावली होती. त्यानंतर पुन्हा सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली.