• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

….आणि जिल्हाधिका-यांच्या अभिनव कल्पनेतून भरडधान्य साठवणूकीसाठी लागणा-या दोन लाख बारदान उपलब्धतेचा प्रश्न सुटला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 24, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात कपाशी पाठोपाठ मका, ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. पणन हंगाम सन 2019-20 (रब्बी) मध्ये किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य (मका, ज्वारी) खरेदी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. जिल्ह्यात भरडधान्याच्या साठवणूकीसाठी किमान दोन लाख बारदानाची आवश्यकता आहे. लाॅकडाऊनमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर बारदान उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एक अभिनव कल्पना मांडून त्यास मुर्तस्वरूप दिल्याने दोन लाख बारदान उपलब्धतेचा प्रश्न तर सुटलाच शिवाय शेतक-यांचे धान्य वेळेत खरेदी केले जाणार असून स्वस्त धान्य दुकानदारांकडे पडून असलेल्या चांगल्या दर्जाच्या बारदानास शासकीय दर मिळणार आहे.

पणन हंगाम सन 2019-20 करीता शासनाने किमान आधारभूत किंमती जाहिर केल्या आहेत. या आधारभूत किंमतीचा शेतक-यांना लाभ होण्याच्यादृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीस धान्य विकावे लागू नये यासाठी राज्य शासनाने ज्वारी आणि मका खरेदीसाठी खरेदी केंद्र उघडणेबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात एकूण 18 केंद्रांना भरडधान्य खरेदीसाठी मंजुरी द्यावी असा प्रस्ताव जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी तातडीने या सर्व केंद्रांना मंजूरी दिली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक केंद्र यासाठी मंजूर करण्यात आले आहे.

या केंद्रांवर खरेदी करण्यात येणारे भरडधान्य साठवणूकीसाठी जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी 2 लाख गोण्यांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. Corona Virus (Covid – 19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात इतक्या मोठ्या संख्येने बारदान उपलब्धतेचा प्रश्न प्रशासनापुढे होता. खरेदी केलेल्या भरड धान्याची साठवणूक करणेसाठी बारदान उपलब्धता हे एक प्रशासनापुढे आव्हानच होते. बारदानाशिवाय धान्याची साठवणूक, यासाठी तातडीने निधी उपलब्ध करणे, तातडीने बारदानाची वाहतूक संबंधीत केंद्राकडे करणे अशा अशक्यप्राय प्रश्नांची सोडवणूक प्रशासनास करावी लागणार होती. तथापी जिल्हाधिकारी डॅा. अविनाश ढाकणे यांनी या प्रश्नांची सोडवणूक अतिशय सहजरित्या केली.

सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत जिल्हा प्रशासनाकडून रास्त भाव दुकानदारांमार्फत अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजना, सद्यःस्थितीत लागू असलेली एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी सवलतीच्या दरात गहू आणि तांदूळ उपलब्धतेची योजना आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत उपलब्ध होणारा तांदूळ लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. रास्त भाव दुकानदार या धान्याचे वाटप केल्यावर शिल्लक राहिलेले बारदान बाजारात ज्याप्रमाणे दर असेल त्या भावात विकत असतात. Corona Virus (Covid – 19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध धान्याचे वाटप लक्षात घेता रास्त भाव दुकानदारांकडे असणा-या रिक्त झालेल्या बारदानांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. लाॅकडाऊनमुळे सद्यस्थितीत बारदान मार्केटमध्ये विक्री करणे रास्त भाव दुकानदारांना शक्य नसल्याने हे बारदान दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणावर पडून होते. या शिल्लक बारदानातून दुकानदारांनी उपयोगी बारदान प्रशासनाला उपलब्ध करून दिले तर प्रशासनाचा प्रश्न चुटकीसरशी सुटणार होता. नेमकी हिच बाब जिल्हाधिकारी यांनी हेरुन दुकानदारांकडून शिल्लक बारदान उचलणेबाबत पुरवठा विभागास सुचना दिल्या. शिल्लक बारदान त्वरीत उचलले जाणार असल्याने दुकानदारांकडे देखील येणारे पुढील धान्य साठवणूकीसाठी जागा उपलब्ध होणार असून दुकानदारांना शिल्लक बारदान शासनाकडे जमा केल्यावर शासन स्तरावरुन उचित मोबदला देखील मिळणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी या संदर्भात जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांना त्यांचेकडे शिल्लक असलेले उपयोगी बारदान संबंधीत तहसिल कार्यालयाच्या गोदामात उपलब्ध करुन द्यावे असे निर्देश दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात एकूण 1938 रास्त भाव दुकानदार असून प्रत्येक दुकानदाराने किमान 100 ज्युट बारदान उपलब्ध करुन दिल्यास प्रशासनास दोन लाख बारदान भरडधान्य साठवणुकीसाठी त्वरीत उपलब्ध होणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या अभिनव संकल्पनेमुळे प्रशासनाची नविन बारदान खरेदीसाठी लागणाऱ्या निधीची मोठ्या प्रमाणावर बचत झाली असून बारदान उपलब्धता त्वरीत व केंद्राचे ठिकाणीच उपलब्ध होणार असल्याने बारदान उपलब्धता कालावधी व बारदान वाहतूकीचा प्रश्न निकाली निघाला आहे. शिवाय बारदानाअभावी भरडधान्याच्या खरेदीत अडथळा आला असता तोही येणार नाही. त्यामुळे शेतक-यांचा माल तातडीने खरेदी केला जाणार आहे.

जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिनव संकल्पनेचे स्वागत केले असून जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदार याकामी प्रशासनास सहकार्य करीत असून त्यांचेकडील चांगल्या दर्जाचे बारदान तहसील कार्यालयातील गोदामात जमा करीत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी दिली आहे.


 

 

Previous Post

जळगावात पुन्हा एक कोरोना पाॅझिटिव्ह आढळला

Next Post

पहुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ईदनिमित्त मुस्लिम गरजूंना शिरखुर्मा वस्तूंंचे वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पहुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ईदनिमित्त मुस्लिम गरजूंना शिरखुर्मा वस्तूंंचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon