नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोना विषाणूबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. विशेषत: लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त असलेल्या लोकांना ही चिंता सातवत आहे की हे संकट कधी संपणार. जगातील काही देशांमध्ये कोरोना विषाणू किती काळ जगेल, याचा शास्त्रज्ञांनी अंदाज लावला आहे. सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या इनोव्हेकशन लॅबच्या संशोधनानुसार ब्रिटनमधील कोरोनाचे संकट 30 सप्टेंबरपर्यंत टिकेल.
संशोधकांच्या अभ्यासानुसार अमेरिकेमध्ये 11 नोव्हेंबरपर्यंत कोरोनाचा प्रभाव राहील. तर इटलीमध्ये तो 12 ऑगस्ट रोजी संपेल. त्याचबरोबर सिंगापूरला 19 जुलै रोजी कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळेल. या सर्व तारखांची गणना वर्तमान परिस्थिती, संसर्ग दर आणि मृत्यूच्या आकडेवारीच्या आधारे केली गेली आहे. या मानकांमध्ये बदल होऊ शकतो. तसेच तारीख बदलण्याचा अंदाजही आहे. हा अंदाज देखील महत्त्वाचा आहे. कारण काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी असा दावा केला होता की, यूकेमध्ये जूनपर्यंत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण संपेल.
एसयूटीने या अंदाजासह एक इशारा देखील दिला होता. यानुसार मॉडेल्स आणि डेटा बराच जटील आहे आणि वेगवेगळ्या देशांच्या स्थितीनुसार बदलत आहे. त्याच्याबद्दल स्पष्टपणे अंदाज लावणे कठीण आहे. असेही म्हटले होते की, कोरोना संपण्याची तारीख ही शेवटची तारीख लक्षात घेऊन लोकांनी जास्त आनंदित होण्याची गरज नाही. अशा तारखांमुळे लोक बेजबाबदारपणे वागू लागतील आणि व्हायरस नियंत्रणात करण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच याचा संसर्ग कमी करण्यास म्हणावी तशी लोकांची साथ मिळणार नाही. काही दिवसापूर्वी ब्रिटिश अधिकारी शर्मा म्हणाले होते, ब्रिटनला कोरोनाची लस सापडली नाही. आमच्या शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नानंतरही आम्हाला कधीही यशस्वी कोरोना विषाणू लस मिळू शकली नाही.