नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – लॉकडाऊन काळात गुरुग्रामवरुन वडिलांना सायकलवर बसवून 1200 किलोमीटर प्रवास करत पोहोचलेल्या ज्योतीचं सध्या खूप कौतुक होत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी इवांका ट्रंपनं देखील ट्वीट करत ज्योतीचं कौतुक केलं आहे. 15 वर्षीय ज्योती कुमारीनं आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत तब्बल गुरुग्रामवरुन दरभंगा असा 1200 किमी अंतर प्रवास केला आहे. यानंतर ज्योतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
याबाबत ट्वीट करताना इवांकानं म्हटलं आहे, ”15 वर्षाची ज्योती कुमारी आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून सात दिवसात 1,200 किमीचं अंतर पार करत गावी घेऊन गेली. सहनशक्ती आणि प्रेमाच्या या वीरगाथेनं तिनं भारतीय लोकं आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं लक्ष वेधलं आहे.