नवी दिल्ली (वृत्त संस्था) – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज पहाटे योगासनं केली. तसेच ट्विटरव्दारे सर्व भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपतींनी ट्विट करत म्हटलं आहे की, प्राचीन योगा ही मानवतेला भारताची अमूल्य भेट आहे. जगभरातील अधिकाधिक लोक योगासनं करत आहेत हे पाहून मलाआनंद होतोय. संघर्ष आणि तणाव तसेच कोविड-19 संकटाशी सामना करताना श्वसनसंस्था मजबूत करण्यासाठी योगाभ्यास उपयोगी ठरेल, असं त्यांनी म्हटलं आहे.