तालुक्यात भोकर येथे घटना, ग्रामस्थांमुळे ३ दरोडेखोर जेरबंद
ग्रामस्थांचे धाडस, ३ दरोडेखोरांना पकडले
दरोडा टाकून पसार होत असताना डिकसाई गावाजवळ संशयास्पद हालचाली दिसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी दरोडेखोरांना हटकले. ग्रामस्थांनी धाडस दाखवत एका दरोडेखोराला जागीच पकडून बेदम चोप दिला. पाठोपाठ इतर ठिकाणी आणखी दोन दरोडेखोरांना पकडण्यात यश आले. पकडलेल्या संशयितांकडून लुटलेल्या रकमेच्या बॅगाही जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. उर्वरित फरार साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांनी नाकाबंदी करून कसून तपास सुरू केला आहे. या संशयित आरोपींमध्ये नायडोंगरी तालुका चाळीसगाव येथील खुनाच्या आरोपात नुकताच जामीन झालेला एकाचा तसेच दुसरा बऱ्हाणपूर येथील असल्याची माहिती आहे. फरार एका दरोडेखोराचा जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांचे पथक शोध घेत आहेत.दरोड्यात नेमकी किती रोख रक्कम आणि किती किमतीचे सोने लुटले गेले, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नसून बँक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.








