अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
जळगाव ( प्रतिनिधी ) – देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रांगणात आ. राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.


यानंतर महापालिकेच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड,उपायुक्त धनश्री शिंदे, भाजप गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, उज्वलाताई बेंडाळे, गायत्री राणे, सुनील खडके, डॉ. विश्वनाथ खडके, रंजना वानखेडे, नरेंद्र पाटील, सागर सोनवणे, वैशाली पाटील, प्रदीप रोटे, जयश्री पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात जळगाव शहर महानगरपालिकेचे अधिकारी आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. यावेळी उपस्थितांनी देशप्रेम व अखंडतेची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमास जळगाव महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.









