जळगाव (प्रतिनिधी) – सततचा अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे पिकाचं काढणीपश्चात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबींतर्गत गारपीट, भूसख्ख्लन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, विज कोसळून लागणारी आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे वैयक्तीक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात यावेत.
काढणी पश्चात नुकसान या बाबीतंर्गत ज्या पिंकाचे काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते. अशा कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत गारपीट, चक्रीवादळ व चक्रीवादळामुळे आलेल्या पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करावेत.
नुकसानीबाबतचा विहित नमुन्यातील पीक नुकसान सूचना फॉर्म पुर्ण भरून 48 तासांच्या आत विमा कंपनीच्या अधिकृत ई-मेल आयडी ro.mumbai@aicofindia.com, chandralantg@aicofindia.com वर पाठवावेत. अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जमा करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.