• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार प्रयत्न – अर्थमंत्री

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. त्यातच लॉकडाऊन निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिघडली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी मोठ्या गुंतवणुकीच्या महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या. यानुसार शेती क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

हा निधी अन्नाची वाहतूक साठवणूक, शीतगृहे, गोडावून इत्यादींसाठीच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी वापरला जाणार आहे. याचा शेतकऱ्यांबरोबरच कृषी उत्पन्न संस्था, व्यापारी, स्टार्टअप्‌ना फायदा होणार आहे. अन्न टिकणार असल्यामुळे अन्नाच्या निर्यातीलाही याचा लाभ होणार आहे.

शेतकऱ्यांच्या जगण्याचा दर्जा सुधारावा याकरिता या उपाययोजना करण्यात येत आहेत. लॉकडाउनच्या काळात किमान किमतीच्या आधारावर 74 हजार 300 कोटी रुपयांच्या कृषी उत्पादनांची खरेदी करण्यात आली. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 18 हजार 600 कोटी रुपये देण्यात आले. पीक विमा योजनेअंतर्गत 6,400 कोटी रुपयाचे दावे मिटविले. त्या काळात 560 लाख लिटर दुधाचे संकलन केल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वी भारतात अन्नधान्याचे उत्पादन कमी होत होते. त्यावेळी कृषी उत्पादने देशातील ग्राहकांना कमी दरात मिळावी याकरिता जीवनावश्‍यक वस्तू कायदा तयार करण्यात आला होता. शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाच्या साठ्यावर आणि व्यवहारावर मर्यादा टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे अतिरिक्त उत्पादन होऊनही शेतकऱ्यांना ते योग्य बाजारपेठेत विकता येत नव्हते किंवा निर्यात करता येत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे मोल मिळत नव्हते. ही बाब ध्यानात घेऊन आता जीवनावश्‍यक वस्तू कायद्यात बदल करण्यात येणार आहे.

हा बदल केंद्रीय पातळीवर करण्यात येत असल्यामुळे सर्व राज्य सरकार या कायद्याची अंमलबजावणी करतील अशी अपेक्षा सीतारामन यांनी या घोषणा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केली. या निर्णयानुसार बटाटे, डाळी, कांदे इत्यादी वस्तूवरील नियंत्रणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या वस्तूंची योग्य बाजारभावासाठी साठवणूक करता येईल. त्यावर प्रक्रिया करता येईल. प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना या कृषी उत्पादनाच्या साठया वरील मर्यादा लागू राहणार नाहीत. जीवनावश्‍यक वस्तू कायद्यामुळे शेतकऱ्यांची मुस्कटदाबी हात होती. शेतकरी भांडवलाचा आणि आपल्या कष्टाचा वापर करून कृषी उत्पादने तयार करीत असताना या शेतकऱ्यांनी ही उत्पादने कोणाच्या माध्यमातून कुठे विकावीत यावर या कायद्यामुळे मर्यादा येत होत्या. शेतकऱ्यांना व्यवसायिक पद्धतीने शेती करण्यात अडचणी येत होत्या. या सर्वांचा विचार करून शेतकऱ्यांच्या हितासाठी जीवनावश्‍यक वस्तू कायद्यात बदल केला जाणार आहे. मात्र विविध राज्य सरकारे केंद्राच्या या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देतात यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.

अतिरिक्त अन्नधान्य, फळे व भाजीपाला उत्पादनानंतर ते वाया जाऊ नये यासाठी अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यात येणार आहे. यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. त्याचा फायदा 2 लाख सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना होईल, असे त्या म्हणाल्या.

भारतात गायी-म्हशी सारखे 55 लाख पाळीव प्राणी आहेत. मात्र या प्राण्यांचे लसीकरण न झाल्यामुळे या प्राण्याचा दर्जा तसेच दुधाच्या दर्जावर परिणाम होतो. देशातील सर्व प्राण्यांचे सर्व रोगासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. 53 कोटी प्राण्यांच्या लसीकरणासाठी 13,300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

देशात मोठ्या प्रमाणात दूध निर्माण होते. वाहतूक आणि दुधावरील प्रक्रिया केंद्राची स्थिती दर्जेदार नाही. त्यामुळे दूध वाया जाते. त्याचबरोबर अतिरिक्त दुधाची निर्यात केली जाऊ शकत नाही. याकरिता पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.


 

 

Previous Post

जळगाव कंजरवाडा तलवार हल्ला प्रकरणातील फरार तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Next Post

स्थलांतरुबाबात सरकारनेच योग्य ते निर्णय घ्यावेत – सर्वोच्च न्यायालय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्थलांतरुबाबात सरकारनेच योग्य ते निर्णय घ्यावेत - सर्वोच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon