• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यातील कचरा वेचणाऱ्या महिलेची मुख्यमंत्री सहाय्यता फंडमध्ये मदत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी समाजातील विविध स्तरातून मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पीएम केअर्स फंडमध्ये मदत दिली. परंतु पुण्यातील एका कचरा वेचणाऱ्या ‘स्वच्छतादूत’ महिलेचं औदार्य सगळ्यांसमोर सरस ठरेल असंच आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत या महिलेने १५ हजार रुपयांची मदत केली आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तरी देखील मनाने श्रीमंत असलेल्या त्या दानशूर महिलेचे नाव गवळणबाई मुरलीधर उजागरे असे आहे. गवळणबाई विश्रांतवाडीतील भीमनगर या झोपडपट्टीत राहत असून त्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. त्या गेल्या २० वर्षांपासून धानोरीतील स. नं. ५१, भैरवनगर परिसरातील घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करतात. प्रत्येक घरातून दरमहा त्यांना ६०ते ७० रुपये दिले जातात. त्यातही काहीजण पैसे देत नाहीत. तरीदेखील त्या सर्व घरातील कचरा नियमित गोळा करतात. दरमहा मिळणाऱ्या जेमतेम पाच ते सहा हजार रुपयांवर त्यांचा चरितार्थ चालतो. पण तरीही गवळणबाईंच्या मनाच्या श्रीमंतीची तुलना कशासोबतच होऊ शकणार नाही. काही अडचणीच्या प्रसंगी अथवा औषधोपचार करण्यासाठी बचत केलेले पैसे कोरोनाशी दोन हात करण्यासाठी देण्याचे औदार्य दाखविले आहे. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र कराळेकर व छावाप्रमुख धनंजय जाधव यांच्या माध्यमातून ऑनलाईन मुख्यमंत्री फंडात ५ हजार रूपये निधी दिला. तसेच कोरोनाच्या संकट काळात सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्यांनो धानोरीतील माता जिजाऊ प्रतिष्ठान व विश्रांतवाडीतील जीवनज्योती प्रतिष्ठान या दोन सेवाभावी संस्थांना प्रत्येकी ५ हजार रूपये असे एकूण १५ हजार रुपयांची मदत त्यांनी केली आहे. या सेवाभावीवृत्तीचे परिसरातून कौतुक होत आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून त्यांचे आभार मानले. आजपर्यंत असं भयंकर संकट कधी बघितलं नव्हतं. संकटकाळात सगळ्यांनी मदत केली पाहिजे. आपण जगलो तर पुढे अजून कमावता येईल. पण आता लोकांची गरज भागवणं गरजेचे असल्याची भावना गवळनबाईंनी व्यक्त केली. कोरोनाच्या या संकटातही त्या कचरा वेचण्याचं काम करतच आहेत. ‘धोका आहे म्हणून जर सगळेच घरात बसले तर आपलं पोट कसं भरणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अशा परिस्थितीमध्येही त्यांचं धैर्य आणि इच्छाशक्ती कमी झालेली नाही. करोनावर मात करण्यासाठी सध्या अशाच शूरवीरांची गरज आहे.


 

 

Previous Post

धारावीतील मृतांचा आकडा ७ झाला

Next Post

आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित गरजूंना किराणा वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित गरजूंना किराणा वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह
खान्देश

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
जैन कंपनी

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे जागतिक संधिवात दिनानिमित्त व्यायाम सत्राचे आयोजन
खान्देश

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 13, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमेन्समध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ उत्साहात
खान्देश

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात ” फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६ ” उत्साहात संपन्न !

October 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon