मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लाॅकडाऊन करणे पुरेसे नाही तर जे याक्षणी आजारी आहेत आणि यामुळे पीडित आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची गरज आहे. तेव्हाच याला थांबवले जाऊ शकते. असं विधान जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.
लॉकडाऊनची सर्वात मोठी समस्या अशी आहे की जेव्हा ते संपेल तेव्हा लोक अचानक मोठ्या संख्येने बाहेर येतील आणि मग धोका वाढेल, अशीही माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत जगात कोरोना विषाणूची सुमारे 3 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे आली आहेत, तर जवळपास 15 हजारांचा मृत्यू झाला आहे. भारतातही आकडा वाढत असून सुमारे 400 पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदविली गेली आहेत तर 7 मृत्यू झाले आहेत.