• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जेजुरी करोनामुक्‍त असल्याचे अधोरेखित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 13, 2020
in महाराष्ट्र
0

जेजुरी (वृत्तसंस्था) – खंडेरायाच्या जेजुरी नगरितील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री मार्तंड देवसंस्थानने निर्माण केलेल्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी डायलिसिस सेंटरमधील करोनाबाधित कर्मचाऱ्याचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डायलिसिस व देवसंस्थान कर्मचारी, अधिकारी अशा एकूण 32 जणांचा अहवालही निगेटिव्ह आल्याने जेजुरीकरांनी सुटकेचा निश्‍वास सोडला असून जेजुरी करोनामुक्‍त असल्याचे अधोरेखित झाले आहे.

या सेंटरमधील लॅब टेक्‍निशियन म्हणून कार्यरत असलेल्या 24 वर्षीय युवक कर्मचाऱ्याने सुरक्षिततेचा भाग म्हणून स्वत:सह एका रुग्णाची कोविड 19ची चाचणी एका खासगी लॅबमध्ये बुधवारी (दि. 6) केली होती. शुक्रवारी (दि. 8) रात्री डायलिसिस रुग्णाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला तर लॅब टेक्‍निशियनचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यामुळे पुरंदर तालुक्‍यात करोनाबाधित असलेला पहिलाच रुग्ण आढळून आल्याने तालुक्‍यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. बाधित तरुणाला शनिवारी (दि. 9) पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. विशेष म्हणजे या रुग्णामध्ये सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीच लक्षणे आढळून येत नव्हती.

पुणे येथे तपासणीसाठी नेण्यात आलेल्या बाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह असल्यानंतर त्यांनाही रुग्णालयातून सोडण्यात आले असून 14 दिवसांसाठी होमक्‍वारंटाइन करण्यात आले आहे. तर शहरातील एका लॉजमध्ये क्‍वारंटाइअन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यात आले असून 14 दिवस त्यांना होमक्‍वारंटाइन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉजमधून घरी सोडण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे देवसंस्थान कार्यालयात फुले उधळून स्वागत करण्यात आले. तद्‌नंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. तर लॅब टेक्‍निशियनला एक ठिकाणी होम क्‍वारंटाइन ठेवण्यात आले आहे.

संबंधित लॅब टेक्‍निशियनचा पहिला अहवाल पॉझिटिव्ह निघालेल्यानंतर सरकारी अहवाल निगेटिव्ह आल्याने पहिल्या अहवालात नेमकी चूक काय झाली? हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. या साऱ्या प्रकारामुळे देवसंस्थानच्या उपक्रमांना मोठी खीळ बसली आहे. होमक्‍वारंटाइअन कालावधी संपताच नंतर पुन्हा सर्व अधिकारी, कर्मचारी ग्रामस्थांच्या सेवेला हजर होणार असल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.


 

 

Previous Post

पंतप्रधानांना काही महत्वाचे सांगायचे नव्हते – प्रकाश आंबेडकर

Next Post

राज्य शासनाने महामंडळाला 300 कोटी रूपये द्यावे – महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) संघटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्य शासनाने महामंडळाला 300 कोटी रूपये द्यावे - महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) संघटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon