पुणे (वृत्तसंस्था) – भोसरीत उपचार घेत असलेला करोनाच्या रुग्णाने हॉस्पिटलमधून पलायन केले आहे. ही घटना रविवारी रात्री घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली. या रुग्णाला परत आणण्यासाठी हॉस्पिटलचे कर्मचारी आणि पोलीस त्याच्या घरी पोहोचले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण १६ जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर राज्यात एकूण ३३ रुग्ण करोनाग्रस्त आहेत.