पालकमंत्र्यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र
जळगाव (प्रतिनिधी):- शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या संघटनेत महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव येथील नंदू पाटील यांची महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.

या नियुक्तीचे अधिकृत पत्र महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी भोर यांनी नुकतेच प्रदान केले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व संघटना वाढीसाठी सक्रियपणे कार्य कराल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
नंदू पाटील यांची ही नियुक्ती एका वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय आणि सामाजिक स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, शिव वाहतूक सेनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात वाहतूकदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना बळ मिळणार आहे. या निवडीबद्दल नंदू पाटील यांनी शिवसेना नेतृत्वाचे आभार मानले आहेत.









