मुंबई (वृत्तसंस्था) – सत्र न्यायालयाने येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना कोर्टाने 11 मार्चपर्यंत अमलबजावणी संचालनालय (ईडी)चा रिमांड दिला आहे. ईडीने राणा यांना तीन दिवसाचा रिमांड द्यावा अशी मागणी केली होती. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी रात्री त्यांना अटक केली होती. त्यांची शनिवारी सुमारे 20 तास मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. दरम्यान येस बँक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्या घरीही छापा टाकला होता.