मुक्ताईनगरमध्ये १३ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले


तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
मुक्ताईनगर | प्रतिनिधी : मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेबारा ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. संबंधित अल्पवयीन मुलगी घरात असताना आरोपी ऋषिकेश ऊर्फ विलास कैलास पवार (रा. जामठी, ता. बोदवड, हल्ली मुक्काम मुक्ताईनगर) याने तिला काहीतरी आमिष दाखवून अज्ञात कारणासाठी पालकांच्या कायदेशीर ताब्यातून पळवून नेल्याचा आरोप आहे.
मुलगी सकाळी घरात दिसून न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र ती आढळून न आल्याने पालकांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि जयेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.








